गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (12:53 IST)

विषाणूजन्य आजारात लक्षणीय वाढ, सर्दी खोकल्याचे प्रकरण वाढले

बदलत्या हवामानामुळे सध्या विषाणूजन्य आजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या कोरोनाचे प्रकरण मंदावले आहे. गेल्या काही महिन्यापासून  विषाणूजन्य आजार आरएसव्हीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारामध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पाऊस आणि उन्हाचा खेळ सुरु आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर लगेच परिणाम होतो. अलीकडे श्वसनाशी संबंधित विषाणूचा ‘रेस्परेटरी सेन्सिशिअल व्हायरस’ (आरएसव्ही) ची लागण झाल्याचे तज्ज्ञांनी निदान केले आहे.हा एक श्वसन प्रक्रियेशी निगडित आजार असून रोग प्रतिकारक कमी असलेल्या लोकांमध्ये श्वसनाच्या हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. सर्दी होणे, शिंका येणं, ताप, खोकला, अशक्तपणा, डोळे लालसर होणे, अंगदुखी हे या आजाराचे लक्षणे आहे.  सध्या रुग्णामध्ये सर्दी खोकला ताप येणाचे प्रमाण वाढले आहे. या विषाणूजन्य आजारामध्ये रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे कोरोनाच्या लक्षणासारखी आहे. त्यामुळे कोरोना होण्याची भीती वाटते. या साठी कोरोनाची चाचणी देखील केली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित उपचार देता येऊ शकेल. आरव्हीएस झाल्यामुळे घाबरून जाऊ नका. हा इतर आजारांप्रमाणेच एक आजार आहे. लक्षणे कळल्यावर यावर सहज उपचार घेता येत. हवामानात बदल झाल्यास हा आजार उद्भवतो. वेळीच डॉक्टरांशी संपर्क करून यावर उपचार घेऊन रुग्ण चार ते पाच दिवसातच बरा होतो.