रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (11:51 IST)

लासलगावमध्ये म्युकर मायकॉसिसचे सहा तर येवला येथे चार रुग्ण

नाशिकच्या लासलगाव येथे म्युकर मायकॉसिस या नव्या आजाराचे सहा तर येवला येथे चार रुग्ण तपासणीत आढळले आहेत. याची माहिती लासलगाव व येवला येथे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी दिली. म्युकर मायकॉसिस बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील तज्ञ नेत्ररोग तज्ञांकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
 
रक्ताच्या गुठळ्या होणे, डोळ्याखाली तीव्र वेदना होणे, नाक चोंदणे आणि अंधुक दिसणे अशी प्रमुख लक्षणे काळ्या बुरशीची आहेत. श्वासोच्छ्वासास त्रास, रक्ताच्या उलट्या आणि मानसिक स्थिती बिघडणे अशीदेखील लक्षणे आहेत.