आगीत ६ जणांचा मृत्यू ,१४७ जण जखमी
मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या कामगार रुग्णालयाच्या आगीत सहा जणांचा मृत्यू तर एकूण १४७ जण जखमी झाले आहेत. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या ठिकाणी अग्नीशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ४० पेक्षा जास्त रूग्णांना शिडीच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. तसेच कूपर रूग्णालय, होली स्पिरीट हॉस्पिटल, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल या विविध रूग्णालयांमध्ये या रूग्णालयातील रूग्णांना हलवण्यात आले. एकाचा मृत्यू बचाव कार्यादरम्यान झाला होता आता आणखी पाच जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.