गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (10:09 IST)

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

leopard
नाशिक जिल्ह्याच्या धोंडगाव येथे बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही मुलगी काही दिवसांपूर्वी तिच्या मामाच्या गावी गेली होती. या घटनेमुळे ग्रामस्थ वनविभागाविरोधांत संपप्त झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन करु अशा इशारा त्यांनी दिला आहे.
 
गायत्री नवनाथ लिलके असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. मुळची कोचरगाव येथील राहणारी मुलगी काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाकडे आली होती. ती बुधवारी रात्री अंगणात खेळत असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. बिबट्याच्या चाव्यामुळे आणि नखामुळे तिला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
 
ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तिथून पळाला. परिसरातील बिबट्याचा हा दुसरा हल्ला असून घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी पंचानामा पूर्ण केला आहे.
 
काही दिवसांपूर्वी गिरणारे परिसरात सकाळी एका मजुरावर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच गंगापूर-गोवर्धन शिवारातसुद्धा रात्री काही दुचाकीचालकावर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यामुळे नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनाधिका-यांना केली आहे.