शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (12:56 IST)

लवकरच अलिबाग ते पेणदरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरु होणार

new passenger train
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अलिबाग ते पेणदरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे परळ टर्मिनसहून रेल्वे सेवा सुरू करतानाच उपनगरी रेल्वेमार्गावरील अनेक सुविधा आणि प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
 
रेल्वेमंत्र्यांकडे अनेक प्रकल्प घेऊन गेलो होतो आणि त्या सर्व प्रकल्पांना त्यांनी मंजुरी दिली. यापुढेही आचारसंहितेच्या आधी आणि निवडणुकीनंतर रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी घेऊ, असे सांगतानाच फडणवीस म्हणाले की, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा हा ७२६.४५ कोटी रुपयांचा प्रकल्प उल्हासनगरमार्गे जाणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचा ठरेल. मुंबईत सुरू असलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे.