शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:29 IST)

सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा : मुख्यमंत्री

राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठकारेंनी सांगितले. 
 
येत्या २२ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने सवलत द्यावी. सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे. जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये सेवा शुल्क आकारण्यास परवानगी द्यावी. विद्युत वापर नसल्याने देयके कमीतकमी वापरावर आधारित असू नये. मिळकत कर आकारू नये आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.