सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (08:23 IST)

खेळत असलेल्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला

राज्यातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. अंबरनाथमध्येही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा असाच एक प्रकार समोर आलाय. अंबरनाथमधल्या शंकर हाईट्स इमारतीतील कुत्र्यांच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. इमारतीच्या आवारात खेळत असलेल्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तीन कुत्र्यांनी त्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले. या घटनेनं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडालीय. अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय.
 
शंकर हाईट्स फेज 2 इमारतीत 4 वर्षांचा सुमेध लोहार हा चिमुकला त्याच्या मित्रासोबत खेळत होता. यावेळी सोसायटीत असलेल्या तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. यामुळे सुमेध खाली पडला, मात्र तरीही कुत्र्यांनी त्याच्या पाठीचे लचके तोडले. यावेळी सुमेधच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी धावत आले आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावलं.