गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दोषी असेल तर राजीनामा देणार - सुभाष देशमुख

भाजपा पक्षाचा आणि सत्तेत मंत्री असलेल्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे गाव असलेल्या  सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम  बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे वादाला सुरुवात झाली आहे. तर त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधक करत आहेत. यांना उत्तर देत दोषी आढळल्यास मंत्रीपदावरुन दूर होईन. तसंच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करेन, अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी दिली आहे. महापालीकेनुसार बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याखालची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित होती आहे. मात्र सत्तेचा गैर वापर करत  त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग आलिशान  बंगला बांधला आहे.
 
देशमुख यांना 2001 मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारली होती.  देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार राहू असं प्रतिज्ञापत्र मनपाला  दिलं आहे. त्या आधारावर सोलापूर महानगरपालिकेने 2004 साली सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना वन बीएचके (600 स्क्वेअर फूट) बांधकाम करण्यासाठी सशर्त परवाना दिला होता. मात्र झाले उलटेच  सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट 22 हजार 243 स्क्वेअर फुटांचा आहे. त्यावर त्यांनी 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे. सहाशे कुठे आणि हजार  स्केवर   फुट कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.