शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2018 (16:15 IST)

धक्कादायक : आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुण्यातील मुंढवा येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अश्विनी गवारे (22) तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केली आहे. मागील काही दिवसांपासून अश्विनी रजेवर होती. सोमवारी सकाळी ती कामावर रुजू झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आत्महत्या केली.

दरम्यान, अश्विनीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.