शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (15:37 IST)

गरीब मुलाशी लग्न झाल्याने नववधूने गळफास घेत संपवलं आयुष्य, सुसाईड नोट वाचून सर्व हादरले

नागपूर- ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळ दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब असून त्यांचे लग्न चांगल्या श्रीमंत घरी आणि उच्चशिक्षित मुलाशी करण्यात आले. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले. या गोष्टीमुळे नैराश्य आलेल्या नववधूने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच एक धक्का बसला. 
 
29 डिसेंबर 2021 ला अश्विनी आणि हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटात झाले. मुलीकडील सर्व उच्च शिक्षित आणि नोकरीवर होते. हरिदास रणमले (रा. घानमुख, ता. महागाव जि. यवतमाळ) येथील असून गरीब घरातील आहे. त्याला 2020 मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली. तीन वर्षापर्यंत तो शिक्षणसेवक असल्यामुळे त्याला 6 हजार मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो 7 जानेवारीला जलालखेडा येथे राहायला आला. पती, पत्नी व अश्विनीची आजी जलालखेडा येथे भाड्याच्या घरात राहू लागले. 
 
पती रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जायचा आणि नववधू गृहिणी असल्यामुळे दिवसभर घरी राहत होती. महिलेची आजी तिच्यासोबत राहत होती. परंतु रविवारी आजी परत गावी केली असता मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अश्विनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचा उलघडा झाला नव्हता. पण नंतर तिने लिहिलेली डायरी हाती लागली.
 
उप विभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे आणि पोलीस कर्मचारी यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असतात पोलिसांना त्या महिलेने लिहलेली डायरी सापडली. त्या डायरीत जे लिहले होते ते वाचून पोलिसांना धक्काच बसला. आत्महत्या करणाऱ्या महिलेने तिचे लग्न गरीब मुलाशी झाले असल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले.
 
आत्महत्या करणाऱ्या महिलेने त्यात असे लिहले होते की, ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले तो माझ्या जीवनातील काळ दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब असून त्यांचे लग्न चांगल्या श्रीमंत घरी आणि उच्चशिक्षित मुलाशी करण्यात आले. परंतु माझा सर्व परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले.
 
या सर्व गोष्टीमुळे तिला नैराश्य आले होते. सोबत आजी राहत असल्यामुळे ती असे टोकाचे पाऊल उचलू शकली नाही. परंतु आजी गावी जातातच तिने असे टोकाचे पाऊल उचलून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही करीत आहे.