सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2024 (17:29 IST)

भरधाव गाडी थेट हॉटेलात घुसली

apghat
कार अपघात- रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये सकाळी भरधाव कार घुसली. हा अपघात लातूर सोलापूर मार्गावर झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यु झालेला असून चार जण  गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या जखमींमध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. 
 
कार ही सोलापूर-लातूर महामार्गावरुन जात होती. पण चालकाचे नियंत्रण कारवरील सुटल्याने कार थेट औसा येथील सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली.  तसेच या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला आहे त्यांना उपचारासाठी नेत असतांनाच रस्त्यातच त्यांचा मृत्यु झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. व त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच जखमींमध्ये तीन लोक कार मधील आहे व एक जण हॉटेलमधील कामगार आहे. 
 
कारचा चुराडा झाला आहे. अपघात खूप भीषण होता. हॉटेलसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये
या अपघाताचा थरार  कैद झाला आहे. तसेच या अपघातात हॉटेलमधील  कामगार ओंकार कांबळे वय 14 याच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे. तर कारमधील दोघांचा मृत्यु झाला आहे. 

Edited By- Dhanashri Naik