1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (13:26 IST)

कोरोनाचा उद्धव ठाकरेंनी एवढा अभ्यास केला की, ते अर्धे डॉक्टर झालेत : अजित पवार

Chief Minister
"कोरोनावर काम करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एवढा अभ्यास झाला आहे की, ते अर्धे डॉक्टर झाले आहे," असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
 
आम्हाला सर्वांना कोरोना झाला. पण यांच्या अभ्यासामुळे कोरोना या दोघांना भिऊन आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
 
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राज्यभर राबवली आहे. या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्षे जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे."