शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:37 IST)

मुख्यमंत्र्याचा योगी आदित्यनाथ यांना इशारा, आदित्यनाथ यांची सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर बैठक

चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे. चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा आदित्यनाथ यांचा डाव असल्याचा आरोप करीत काँग्रेसने आक्षेप घेतला असतानाच, कोणाला जोर जबरदस्तीने राज्यातून उद्योगांना जाऊ देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
 
मुंबईच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात चित्रनगरी उभारण्यासाठी योगी आदित्यनाथ चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी बुधवारी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर लखनौ महापालिकेचे रोखे सूचीबद्ध होऊन त्यांच्या रोखेबाजारात विक्रीचा प्रारंभ बुधवारी होईल. मुंबई शेअरबाजारात सकाळी १० वाजता त्या कार्यक्रमास योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.
 
त्यानंतर उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधीबाबत ज्येष्ठ उद्योगपती, उद्योग समूहांच्या उच्चपदस्थांशी आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांशी योगी आदित्यनाथ विचारविनिमय करून त्यांना आमंत्रित करणार आहेत. त्यामध्ये टाटा,  एन चंद्रशेखर, बाबा कल्याणी,  हिरानंदानी आदी मान्यवरांचा समावेश आहे. तर सिनेसृष्टीतील दिग्गजांबरोबर ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.