बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:27 IST)

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला, चंद्रपूरात ८.२ अंश सेल्सिअस तापमान

उत्तरेकडी थंड वाऱ्यांचा जोर आणखी वाढल्याने राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान चंद्रपूर येथे ८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. 
 
विदर्भात किमान तापमानाबरोबरच काही भागात कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान २ ते ३ अंशांची घट झाली आहे. परभणीत किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून तेथे मंगळवारी सकाळी पारा १०.१ अंशापर्यंत खाली आला आहे. सरासरीच्या तुलनेत ७.३ अंश सेल्सिअसने घट नोंदविली गेली आहे. कोकणात किमान तापमान सरासरीइतके होते. आणखी दोन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे.