गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:29 IST)

लिफ्टमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू

वसई पूर्व येथील सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वालिव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.