1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (12:48 IST)

मुलीच्या सासरच्या छळाला त्रासून वडिलांची आत्महत्या, मृतदेहाशेजारीच मुलीनेही सोडला जीव

The father of married women committed suicide after being harassed in Nanded
गाडी आणि फ्लॅट हवा यासाठी सासरच्याकडून मुलीचा होत छळ पाहून मुलीच्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे मुलीच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचे समजल्यावर मुलीनंही मृतदेहाशेजारीच प्राण सोडले आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
देगलूर तालुक्यातील सुगाव येथील माधुरी शंकर भोसले हिचा विवाह आठ महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे सोबत झाला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी 5 लाखाची मागणी माधुरी कडे करत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ सुरु केला.
 
माधुरीने ही बाब वडील शंकर भोसले यांना सांगितली. शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीच लग्न कर्ज काढून केलं ते कर्ज फिटलं नाही आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. अशात मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दुखः माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेहाची शेजारीच प्राण सोडले.
 
मृत शंकर भोसले यांच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारी वरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या पाच जणांना विरोधात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.