सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (22:39 IST)

एअरलिफ्टचा वापर करून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणार

ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता एअरलिफ्टचा वापर करून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
 
राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या तिन्ही गोष्टींमध्ये तुटवडा भासत आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुषंगाने मिळाव्यात, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. अत्यंत संवादपूर्ण त्यांनी म्हणणं मांडलं आहे.’