शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (08:14 IST)

विधिमंडळाच अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला, प्रत्येक सदस्याला कोरोना सुरक्षा किट देणार

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशनाअगोदर एक दिवस म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
 
प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरचा समावेश असेल. सदस्यांच्या स्वीय सचिवांना सभागृहात प्रवेश मिळणार नाही. मात्र, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सदस्यांच्या वाहनचालकांची देखील बसण्याची तसेच नाश्ता, चहापाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
 
इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चर्चेदरम्यान अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके घेण्यात येणार आहेत.