बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (07:58 IST)

1140 वर्षातील हस्तलिखित अमूल्य ग्रंथ श्री सिद्धेश्वर महाराजांच्या ऐतिहासिक चरित्रग्रंथाची चोरी

सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यांचा ताम्रपटावर अच्चकन्नड भाषेत लिहिलेला 50 पानी आत्मचरित्राची चोरी झाला. ही घटना उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ात गुरुवारी रात्री 11.30 नंतर घडली. दरम्यान, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत सागर राजशेखर हिरेहब्बू (रा. उत्तर कसबा, हिरेहब्बू निवास) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाडा (निवास) येथे परंपरेप्रमाणे श्री शिवयोगी सिद्धेश्वर पूजास्थान आहे. त्याठिकाणी सागवानाच्या पेटीत श्री सिद्धेश्वर महाराज यांचा चरित्रग्रंथ जपून ठेवण्यात आला होता. त्याची नित्य पूजा-अर्चा हिरेहब्बू यांच्याकडून होत असते. दरम्यान, गुरुवारी पहाटे आणि सकाळची पूजा झाल्यानंतर पूजा स्थानाचे दार नेहमीप्रमाणे पुढे करून हिरेहब्बू यांच्याकडून कडी लावून दार बंद करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे 4.30 च्या वेळेस पूजेकरिता गेल्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराजांचा चरित्रग्रंथ असलेली पेटी आणि इतर साहित्य नसल्याचे फिर्यादी यांना दिसून आले. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू आणि इतरांना फिर्यादी यांनी याबाबतची माहिती दिली.