रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (07:30 IST)

आमच्या गटात अस्वस्थता आहे. मात्र, सरकारमधून बंडखोरी

sanjay raut
शिंदे नुकतेच आपल्या गटातील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाऊन आले. या दौऱ्यात भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली असली तरी अनेक आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. संबंधित नेत्यांनी विविध कारणं देत अयोध्या दौरा टाळला आहे. यावरून “सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे” असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
 
राऊतांच्या विधानानंतर शिंदे गटाच्या विविध नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊन आमच्यात नाराजी नाही, असं सांगितलं. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊतांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. “आमच्या गटात अस्वस्थता आहे. मात्र, सरकारमधून बंडखोरी करण्याइतकी अस्वस्थता आमच्यात नाही, ” असं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते “टीव्ही ९ मराठी”शी बोलत होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor