मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (22:18 IST)

त्यांचं डोक्याचं संतुलन बिघडलं आहे, त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे शॉक दिले पाहिजे

lost their balance
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी देखील नारायण राणेंवर पुन्हा एकदा गंभीर टीका केली आहे.गुलाबराव पाटील म्हणाले, ”यात्रा काढणं हा त्यांचा अधिकार होता, यात्रा काढण्याबद्दल कुणाचंही दुमत नव्हतं. यापूर्वी देखील प्रत्येक पक्षाने आपल्या परीने यात्रा काढलेल्या आहेत. पण त्यांनी जे वक्तव्यं केलं होतं की ते कोणत्याही लोकशाहीमध्ये झालेल्या घटनेत सगळ्यात वाईट घटना त्यांनी त्या दिवशी केली. यापूर्वी जर आपण यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतर आदर्श नेत्यांची नावं आपण पाहिली, तर कोणत्याही नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नव्हतं. अशाप्रकारचं वक्तव्यं नारायण राणे सारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलं. मला तर असं वाटतं की… मी कालही बोललो आणि आजही सांगतोय, त्यांचं डोक्याचं संतुलन बिघडलं आहे. त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे शॉक दिले पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांची तपासणी करून, त्यांना पक्षाच्या कामासाठी आजची जी रथयात्रा जी सुरू झाली आहे, त्या यात्रेला थांबवून पुन्हा ती सुरू करण्यासाठी मला तरी वाटतं की, त्यांची चाचणी व्हावी. आज त्यांना अटक झाली हे चागंलं काम झालं. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा जर असेल, तरी तो मुख्यमंत्री हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो १२ कोटी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्या पदाचा मान राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने केलेली कारवाई योग्य आहे, असं मला वाटतं.”