रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (23:29 IST)

पुणे, सातारा, सांगली, ठाण्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात सध्या 63 हजार 262 ॲक्टिव्ह कोरोना आहेत. त्यापैकी पुण्यात सर्वाधिक 14 हजार 738 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल सातारा मध्ये 7 हजार 295, सांगलीत 6 हजार 591 तर ठाण्यात 6 हजार 576 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात शनिवारी 5 हजार 787 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 5 हजार 352 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 87 हजार 863 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 86 हजार 223 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात 134 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 34 हजार 909 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.84 टक्के एवढा झाला आहे.