बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (16:53 IST)

पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण

पुणे- शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित पहिल्या रुग्णाची पुष्टी झाली आहे. जिल्ह्यात आजवर एकूण सहा रूग्ण आढळले असून, त्यातील एक रूग्ण शहरातील असल्याचे, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे. 
 
पुणे शहरात आढळलेला रुग्णाला कोणतेही लक्षणे नसून, त्याला जुलै महिन्याच्या 16 तारखेला कोरोनाची बाधा झाली होती. संबंधित रुग्णाला रुग्णालयातही दाखल करण्याची गरज पडली नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. शहरात आता कोरोनासंबंधीचे निर्बंध उठविण्यात येत असतानाच, डेल्टा प्लस व्हेरीयंटचा रूग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण जळगाव (१३) मध्ये आहे. आढळलेल्या ६६ रुग्णांपैकी १० रुग्णांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे. तर आठ जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाच्या एकूण प्रमाणापैकी पुन्हा कोरोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
 
राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांचा आकडा 66 वर गेला असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये 13, रत्नागिरीत 12, मुंबईत 11, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 6, पालघर आणि रायगडमध्ये प्रत्येकी 3, नांदेड आणि गोंदियात प्रत्येकी 2, चंद्रपूर,अकोला,सांगली, औरंगाबाद,बीड येथे प्रत्येकी 1 असे एकूण 66 रुग्ण असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.  तर 66 पैकी 8 जणांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेऊन त्यांना देखील डेल्टा प्लसची लागण झाल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. 18 पैकी 16 लोकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू डेल्टा प्लसमुळेच झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.