शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 एप्रिल 2021 (08:54 IST)

पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत केली ही मागणी

हॉस्पिटल डिस्चार्ज घेतलेले पेशंट घरी सोडले जातात. मात्र घरी गेल्यानंतर विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सदर पेशंट कुटुंबात व समाजात वावरतात.त्यामुळे इतर व्यक्तीना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. यामुळे अशा व्यक्तींच्या सोयीसाठी हिवरेबाजरचे पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन पाठविले आहे.यामध्ये पवार यांनी म्हंटले आहे कि, हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिलेल्या पेशंटला घरी न नेता १४ दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
 
त्यासाठी ज्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी व राहण्याची चांगली व्यवस्था असेल असे मंगलकार्यालय, शाळा, कॉलेजस हे ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात यावी.तसेच एखादा पेशंट नजर चुकवून विलगीकरण कक्षात न जाता घरी गेल्यास पोलीस यंत्रणेला कळवून त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. विलगीकरण कक्षात पेशंटला वेळेवर गोळ्या, जेवण एवढीच व्यवस्था करण्याची गरज आहे. एखादा पेशंट जास्त क्रिटीकल परिस्थितीमध्ये असल्यास त्याला पुन्हा हॉस्पिटल पर्यंत पोचविण्याची जबाबदारी हि विलगीकरण कक्षाची राहील अशा काही उपयायोजना कराव्यात.