गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:38 IST)

असे दिसून आले राज ठाकरे यांचे टेनिस प्रेम

This is how Raj Thackeray's love of tennis was seen
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टेनिस खेळताना डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.  त्यांच्या डाव्या हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. हाताला फ्रॅक्चर झाला असेल तर गरज भासल्यास डॉक्टर त्यावर आधार देण्यासाठी प्लास्टर करतात. अनेकजण या प्लास्टरवर विविध रेखाटने, चित्र, नावे काढतात. तर काहींचे मित्रही आपले नाव त्या सफेद दिसणाऱ्या प्लास्टरवर काढत असतात.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या डाव्या हाताच्या प्लास्टरवर टेनिस लिहिले आहे तसेच टेनिस बॅटचे चित्रही रेखाटले आहे.
नवी मुंबईतील टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात हजर राहिले होते. यावेळी त्यांच्या डाव्या हाताला केलेल्या प्लास्टरवर काही मजकूर लिहिला असल्याचे फोटोत स्पष्ट दिसत होते.