बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (14:00 IST)

काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे बॉंबस्फोट- प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar
राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या 15 दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले “येत्या 15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार असून 1 नाही तर 2 बॉम्बस्फोट असतील. ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू असून आमच्या युतीची काळजी विरोधकांनी करू नये.” असा दावा प्रकार आंबेडकर यांनी केला आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor