सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (13:46 IST)

कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू

औंध-पुसेगाव मार्गावरील पोवई माळ परिसरात टाटा सफारी (एमएच 12 जेएन 2500) या कारने भोसरे (ता. खटाव) येथील कीर्तनकार कुणाल शंकर जाधव (वय 23) हे शनिवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून सहकारी कीर्तनकार अभिजित येलगे (वय 36, रा. देवाची आळंदी) आणि बाबा निवृत्ती जगदाळे (रा. बोथे, ता. माण) यांना घेऊन पुसेगावच्या दिशेने निघाले होते तेव्हा त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.
 
याच रस्त्यावरून प्रवास करणारे अक्षय जाधव यांनी जखमींना खासगी आणि शासकीय रुग्णवाहिकेतून पुसेगाव आरोग्य केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे पोहोचवण्याची व्यवस्था केली. कीर्तनकार कुणाल जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अभिजीत येलगे यांचा सिव्हिलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोथे येथील बाबा जगदाळे यांच्यावर सातार्‍यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
याप्रकरणी भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कारचालक जीवन पांडुरंग जाधव (रा. गादेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.