शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2017 (23:16 IST)

आणखी पाच शहरांचा समावेश ‘उडान’ योजनेत करा

‘उडान’ योजनेत राज्यातील आणखी पाच शहरांचा समावेश करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. अमरावती, गोंदिया, शिर्डी, रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग शहारांचा या योजनेत समावेश करा, अशी मागणी करण्यात आली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या उडानच्या नव्या मार्गांमध्ये जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये या हवाई सफरीचा नागरिकांना आनंद घेता येणार आहे.