शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:56 IST)

राज्यात हॉटेल्स आणि मॉल्स कधी उघडणार, उद्धव ठाकरे आजच्या बैठकीत ठरवतील

महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्टपासून सामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकल सुरू केली आहे, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेव्हापासून लोकांच्या नजरा उद्धव ठाकरेंच्या कोरोना टास्क फोर्ससोबत आज होणाऱ्या सभेवर आहेत.एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी रात्री 8:30 वाजता राज्याच्या कोविड टास्कफोर्स सोबत वर्चूव्हल बैठक घेणार आहेत.अशी अपेक्षा आहे की या बैठकीत ठाकरे कोरोना निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा करू शकतात. 
 
मुख्यमंत्र्यांनी रविवारी जाहीर केले होते की 15 ऑगस्टपासून पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर 14 दिवसांचे अंतर असावे असेही सांगितले होते.
 
ठाकरे यांनी शनिवारी म्हटले होते की, त्यांचे सरकार येत्या काही दिवसांत आणखी कोविड निर्बंध शिथिल करण्याची योजना आखत आहे. ठाकरे म्हणाले होते की हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि धार्मिक स्थळांवरील निर्बंध कमी करण्याचा निर्णय सोमवारी राज्य कोविड -19 टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत घेतला जाईल. 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 9 ऑगस्टपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती,परंतु सकारात्मकतेचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास निर्बंध पुन्हा लागू केले जातील असा इशारा दिला.
 
राज्य सरकारने आतापर्यंत सर्वात कमी कोविड पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या 14 जिल्ह्यांमध्ये कोविड-प्रेरित निर्बंध कमी केले आहेत आणि रात्री 8 पर्यंत दुकाने व्यवसायासाठी खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना 17 ऑगस्टपासून ग्रामीण आणि शहरी भागात वर्ग पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नागरिकांना कोविड -19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना ठाकरे यांनी इशारा दिला की एकदा प्रकरणे पुन्हा वाढली की निर्बंध पुन्हा लागू केले जातील. “मी पुन्हा एकदा विनम्रपणे विनंती करीत आहे की आपण कोविड-19 नियमांचे  पालन करा,” ते रविवारी त्यांच्या भाषणात म्हणाले.
 
तिसऱ्या लाटेच्या अपेक्षेने महाराष्ट्राने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी नागरिकांना दिली. महाराष्ट्रात, गेल्या 24 तासांमध्ये कोविड -19 चे 5,508 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 151 लोकांचा मृत्यू झाला आहे.