मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:29 IST)

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा श्रेयवाद

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे. कोणतीही राजकारण न करता कारखान्याला थकहमी आपणच मिळवून दिल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर पंकजा यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे.
 
राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१ कोटी रुपयांची थकहमी दिली आहे. या ३४ कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर विरोधातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.
 
त्यामुळे  राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी ११ कोटी रुपयांची थकहमी दिल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे.