पंकजा मुंडे पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करणार
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परदेशवारी झाल्यावर परत आल्यावर, कोरोना संकट दूर झाल्यावर, जनजीव सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून लांब आहेत.
एक फेसबुक पोस्ट द्वारे बऱ्याच कालावधी नंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावे लागणार आहे. तेव्हा त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे.