मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (13:06 IST)

बीड मध्ये सौताडा दरीत उडी मारून ग्राम सेवकाची आत्महत्या

बीड च्या पाटोदा तालुक्यातील सौताडामध्ये श्री क्षेत्र रामेश्वराच्या धबधब्यावरुन एका 50 वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.एकाच आठवड्यात ही दुसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे. 

काही पर्यटकांनी या व्यक्तीला धबधब्यावरून उडी मारताना बघितले आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास घेत असताना त्यांना या मृत व्यक्तीची एक बॅग सापडली असून त्यात त्याचे ओळखपत्र सापडले या मृत व्यक्तीचे नाव झुंबर मुरलीधर गवांदे असून ते पंचायत समिती कार्यालय श्रीगौंडा येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. 

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.असे म्हटले जात आहे की, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे पोलीस अद्याप कारणांचा शोध घेत आहे. धबधब्यावरून उंच उडी मारल्यामुळे अद्याप मृतदेह सापडले नाही.पोलिसांनी मयत इसमाच्या कुटुंबियांशी संपर्क साधून प्रकरणाची तपास करत आहे.या पूर्वी एका महिलेने देखील या धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या आठवड्यात ही दुसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे.