नोकरी जाणार? वानखेडे चे सूचक ट्विट- “मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीकडून क्लीनचिट मिळाली. त्यानंतर आर्यन खानवर कारवाई करणारे एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे च्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. असे असतानाच समीर वानखेडे यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
वानखेडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही. तुम्ही जर असे केले तर कोणतीही प्रगती होणार नाही. तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्हाला नेहमी गोष्टींच्या सकारात्मक बाजूकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही जे करता त्यावर तुमचं नियंत्रण असतं.”
खोटं प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचाही वानखेडें यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तूर्तास वानखेडे यांना पदावरुन हटवले जाण्याची शक्यता केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली आहे. आर्यन खान प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य केलं नाही. अथवा समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात येते.