शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:17 IST)

ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार : विनायक राऊत

एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.  एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाच्या धमक्या देणे  हा केंद्रीय पदाचा दुरूपयोग आहे. हे बोलताना त्यांनी ईडीच्या कागदपत्रांची चोरी केलीये का? किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्याशी हातमिळवणी केली असेल. ईडी कशा सुपाऱ्या वाजवते. त्यांचे सुरू असलेले उपद्व्याप याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत.
 
सकाळी नारायण राणे यांनी अत्यंत पुचाट आरोप केले आहे. परंतू दुसऱ्यावर खुणाचे आरोप करीत असताना, त्यावेळी त्यांना काही गोष्टी आठवण करून द्यायच्या आहेत.
 
राणेंच्या कार्यकाळात सिंधुदूर्गात खून, मारहाण, दमदाटी धमक्यांचे प्रकार ९ वर्ष सुरू होते. दरम्यानच्या काळात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे निर्घुन खून कोणी केले. श्रीधर नाईक यांच्या खूनात तर प्रत्यक्ष आरोपी कोण होतं. हे आम्हाला बोलायला लावू नका. या सर्व खुनांच्या मागे कोण होतं हे महाराष्ट्राला माहित आहे. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी तर विधीमंडळात राणेंच्या इतिहासाची कुंडली वाचली होती.  त्यात ते म्हणतात की, रमेश गोवेकरांचं काय झालं, अंकूश राणे यांचं काय झालं? हे लक्षात घेतल्यावर पार्टी विथ क्रिमिनल कोण आहेत. हे लक्षात येतं.'