शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (13:34 IST)

औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आलं. सोहळ्यासाठी मध्यरात्रीपर्यंत औरंगबादकर शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

औरंगाबादेतील या पुतळा अनावरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. शिवजयंती असल्यानं आधीच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची मागणी केली जात होती. तर औरंगाबाद महापालिकेनं शुक्रवारी मध्यरात्री पुतळ्याचं अनावरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मध्यरात्री आधीच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच अखेर पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देशातील सर्वात उंच आश्वरुढ पुतळा आहे. पुतळ्याची उंची 21 फूट तर चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची 52 फूट एवढी आहे.