1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (19:21 IST)

Weather News : राज्यात पुढील 3 तासात विजांच्या गडगडाटासह अति मुसळधार पावसाची शक्यता

Weather News: Heavy rains with thunderstorms expected in the next 3 hours in the state Maharashtra News Regional Marathi News
यंदा बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सर्वत्र मुसळधार पावसाला समोरी जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस असताना राज्यातील काही भागात पावसाचा उद्रेक सुरूच आहे. बऱ्याच ठिकाणी नदीपात्रात पूर आला आहे. गाय गुरे पुराच्या पावसात वाहून गेल्याच्या बातम्या मिळाल्या आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाने झोडपून काढले आहे. या भागात सतत मुसळधार पाऊस सुरु असल्याने शेतकरी फार काळजीत आहे. त्यांच्या पिकावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. 

हवामान खात्यानं या दरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य , मराठवाडा, पालघर,पुणे, विदर्भाच्या काळी भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्या कडून या भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे येत्या 3-4 तासात वादळी वारं आणि विजांचा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.लोकांना घरातून आवश्यक कामानिमित्तानेच बाहेर पडण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहावे असे सांगण्यात आले आहे.