1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (07:39 IST)

वाचा, नितेश राणे यांनी काय आश्वासन दिल आहे

assurance
आपल्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खासगी रुग्णालयातही मोफत लस देण्याचं आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिलंय. 
 
माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सदस्यांना कोविड लस आणि तीही सरकारी रुग्णालयात विनामूल्य मिळेलच. पण, माझ्या मतदारसंघातील जे 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली तरी, त्यांना ती मोफत देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. प्रत्येकास सुरक्षित आणि निरोगी आयुष्य मिळावे हेच आमचं ध्येय असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.