बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (20:56 IST)

काय म्हणता, छगन भुजबळ यांची 7 जानेवारीला नांदेडमध्ये भव्य सभा

chagan bhujbal
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणला बसणार आहेत. 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील जालन्यातील आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेला येण्यासाठी निघणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी छगन भुजबळ यांची 7 जानेवारीला नांदेडमधील नायगाव तालुक्यातील नरसी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी जनमोर्चातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये त्याचप्रमाणे सरकारने स्थापन केलेली समती रद्द करत त्यांच्या कडून वाटत करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र देखील रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी छगन भुजबळ, बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, विनय कोरे, विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचे आयोजकानी सांगितलं.
 
मिळाल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरापासून या महामेळाव्याची तयारी करण्यात येत आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी 21 समित्या स्थापन केल्या आहेत. या सभेसाठी जिल्ह्याभरातून लाखो ओबीसी समाजबांधव सहभागी होणर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 5 हजार स्वयंसेवक त्यासाठी नियुक्त केले आहेत. सोबतच, 1 लाख पाणी बॉटल आणि त्याचसोबत जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor