मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (20:41 IST)

ललित पाटीलला का आणि कोणासाठी वाचवलं जातय

Sushma Andhare
ललित पाटील प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांतपणे खोटं बोलत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. ललित पाटीलला का आणि कोणासाठी वाचवलं जात आहे, असाही संतप्त सवाल अंधारेंनी केला आहे.
 
महाराष्ट्रातील ड्ग्ज कारखाने आणि ललित पाटील प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांना का बोलू दिले नाही, असाही सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
 
देवेंद्र फडणवीस हे ललित पाटील प्रकरणी शांतपणे खोटं बोलत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोर्हे यांनी आपल्या पदाचा आदर राखत ललित पाटील प्रकरणी सभागृहाला माहिती देणे आवश्यक होते. त्या स्वतः पुण्यातील आहेत. त्यांच्या शहरात काय घडत आहे, त्यांना माहित नव्हते का?

असा खोचक सवाल अंधारेंनी केला. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर या विषयावर पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहेत. मात्र सभागृहात त्यांना या विषयावर बोलण्याची संधी सत्ताधाऱ्यांनी दिली नाही, असाही आरोप अंधारेंनी केला

Edited By-Ratnadeep Ranshoor