बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (09:22 IST)

पत्नीने केली आत्महत्या, महिना उलटत नाही तोच पतीनेही घेतला गळफास

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या जुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक (वय-३५) या तरुणाने  राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, महिनाभराअगोदरच त्याच्या पत्नीने देखील गळफास घेतला हेाता. कर्जाला कंटाळून खाटीक दाम्पत्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
 
सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-35) हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन तसेच भिशीच्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावत होत्या होत्या. कोरोनाच्या संकटात बचतगटाचे कर्ज थकल्याने गेल्या महिन्यातच नजमाबी यांनी स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येला महिना लोटत नाही तोच पतीने देखील गळफास घेत जीवन संपविले. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता जुबेर घरात एकटा असतांना त्याने वरच्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्त्या केली. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.निता पवार यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषीत केले.मयत जुबेरच्या पश्चात 10 वर्षीय मुलगी नुजहत असून महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयात कुटूंबीयांनी एकच हंबरडा फोडला.पोलिसांनी रुग्णालयात उपस्थिती देत पुढील कार्यवाही केली. प्राथमिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.