रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (10:07 IST)

पूजा करताना नदीकाठी घसरला पत्नीचा पाय, वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू

साकरुर्ली येथे नदीत बुडून एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  हे जोडपं देवीपूजा साठी नदीवर गेले असताना बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
आत्माराम आणि कुंदा बोरकर अशी मृतांची नावे आहेत. हे तरोडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून यांच्या मुलाचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले. हे जोडपे परंपरेप्रमाणे पूजेसाठी नदीवर गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.
 
या दाम्पत्याने आधी साकरुर्ली येथील देवी मातेच्या मंदिरात पूजा केली नंतर ते मंदिराच्या मागे नदीत पूजा करण्यासाठी जात असतानाच पत्नीचा पाय घसरून नदीत पडल्या आणि पाण्यात बुडू लागल्या. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पती आत्माराम बोरकर हे देखील नदीत बुडाले.
 
नदीच्या खोल दरीत हे जोडपे बुडाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नदीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.