शहरातील बेगमपुरा भागातील रहिवासी असलेल्या महिला पतीसह गुरुवारी छावणीत भरणा-या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी सायंकाळी गेल्या होत्या. विद्यापीठातील काही मुलांसाठी घरी मेस चालविण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी सुरू होती. बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने मंगला यांची वेणीच कापून टाकली. वेणीवर क्लिप लावलेली असल्यामुळे केस घटनास्थळी गळाले नाहीत. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.