शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (07:40 IST)

भराडी देवीची यात्रा, आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग सील

कोकणातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरती मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अन्य भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाकडून सील केले जातील, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
 
राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले. या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबीय मर्यादित होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेत आंगणे कुटुंबीय यांचीही एकाच वेळी गर्दी होऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मंडळ यांची यात्रा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या सूचना केल्या. दर्शनासाठी येणाऱ्या आंगणे कुटूंबियांना त्यांची ओळखपत्रे देण्यात येणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.