1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 3 मार्च 2022 (08:35 IST)

माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

You cannot break my 170 dices
महाराष्ट्र सरकार पडणार नाही. आपले १७० आमदार आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. परंतु माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना केलं आहे. तसेच ते तुमची गुमालगिरी करणार नाहीत, असं म्हटलं आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.
 
सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं, ते पिलू वळवळ करत होतं, आता फुत्कारत आहे, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. दहशतवादी म्हणून दाऊतला ओरडणाऱ्या दहशतावाद्याला विरोधकांनी पकडून दाखवा. तसेच नको तिथे धाडी टाकून नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, हे आता खपवून घेतलं जाणार नाही. कुठल्याही त्रासाचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.