1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:57 IST)

कारगिल चौक भागात रात्री जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून

Young man murdered in Kargil Chowk area Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
नाशिकमध्ये लेखानगर चौपाटीजवळ एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल चौक भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धारदार शस्त्राने भाेसकून खून करण्यात आल्याच्या घटनेने परिसर हादरला.
 
माहितीनुसार, अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगारासह तिघांनी धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.खुनाच्या घटनेनंतर सराईत गुन्हेगासह हल्लेखोर फरार झाला असून,पोलीस त्याच्या मागावर आहेत.राहुल गवळी (वय २५, रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळीसमोर गेल्या बुधवारी २८ जुलै रोजी रात्री एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार ताजा असताना मंगळवारी पुन्हा असाच प्रकार घडला आहे.अंबड पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी नऊ वाजेच्या सुमारास राहुल गवळी (२५) या तरुणास अंबड येथील कारगिल चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्राने भोसकले. यात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.