नगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार
बीड जिल्ह्यातील धारूरच्या भाजप नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे नगराध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच ते खाजगी दवाखाना चालवतात.काल दुपारी एक गरोदर महिला तपासणी करण्यासाठी आली.तुझी सोनोग्राफी करावी लागणार असे सांगून सोनोग्राफी सेंटर मध्ये अश्लील चाळे करू लागला.त्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि डॉक्टरांचा विरोधात तक्रार करण्यासाठी धारूर ठाण्यात पोहोचली.डॉ च्या विरोधात विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
डॉक्टर हजारी ने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगितले आहे.हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी डॉक्टर आणि व्यापारी असोशिएशन कडून केली जात आहे.याच्या विरोधात असोशिएसन कडून हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले.बीड मध्ये या घटनेमुळे राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.