1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By विकास शिरपूरकर|

कोल्हापूरात चित्रपटव्यवसायिकांचे संमेलन

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे येत्या ८ व ९ ऑगस्ट रोजी मराठी चित्रपट व्यवसायिकांच्या भव्य संमेलनाचे आयोजन क.रण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते अजय सरपोतदार यांनी दिली.

मराठी चित्रपट व्यवसाय आणि मराठी चित्रपटांची निर्मिती या विषयावर संमेलनात चर्चा होईल. दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात निर्मिती व्यवस्थापन, जाहिरात वितरण, आशयघन व व्यावसायिक चित्रपट माध्यम आणि प्रेक्षकांची भूमिका आदी प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. चित्रपट व्यवसायाशी संबंधितांना या संमेलनात सहभागी होता येईल अशी माहिती सरपोतदार यांनी दिली.

महामंडळाकडे असलेल्या ठेवी व त्यावर मिळणारी व्याजाची रक्कम यांचे काय करायचे असा प्रश्न आम्हाला पडत होता. त्यावर गोव्यात असलेल्या कला अकादमीप्रमाणेच कोल्हापूरातही स्वतंत्र सांस्कृतीक केंद्र उभारण्याचा विचार सर्वांनी केला असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या जागेच्या मागणीसही होकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.