1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 8 जून 2015 (12:41 IST)

दहावीत कोकणची पोरं हुशार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेत राज्याचा एकूण निकाल 91.46 टक्के लागला असून कोकण विभागाचा सर्वाधिक 96.54 टक्के निकाल लागला आहे.

गेल्यावर्षी पेक्षा यंदा निकालात 3.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 90.18 टक्के असून, उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 92.94 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून, कोकण विभागाचा निकाल 96.54 टक्के, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 87.46 टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या
4731 आहे, तर शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 21 एवढी आहे.