शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (07:00 IST)

अरुणेश्वर महादेव मंदिर निंभोरा

Aruneshwar Dham
अरुणेश्वर धाम एक शांत वातावरण प्रदान करते. अरुणेश्वर धाम महाराष्ट्रामधील एक रत्न आहे. जे  आध्यात्मिकता आणि नैसर्गिक सुंदरतेची एक देणगी आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे.  
 
मंदिराची मान्यता आणि विराजमान भगवान अरुणेश्वर धाम आपल्या आध्यात्मिक महत्वाची प्रसिद्ध आहे.  हे मंदिर दूर दूरच्या भक्तांना आकर्षित करते. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दूर दुरून श्रद्धाळू मंदिरात दाखल होतात. मंदिर परिसराचे मुख्य आकर्षण अरुणेश्वर मंदिर आहे. जे भगवान शंकरांना समर्पित आहे. मंदिराची  वास्तुकला माहाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा दर्शवते. तसेच जटिल नक्षीकाम आणि मुर्त्या प्रदर्शित करते. मुख्य मंदिराशिवाय, अरुणेश्वर धाम मध्ये वेगवेगळ्या देवतांना समर्पित छोटे छोटे मंदिर आहे. हे मंदिरे हिंदू पौराणिक कथा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक परंपरेची ओळख करून देण्यासाठी योग्य पर्याय आहे. 
 
पौराणिक आख्यायिका- 
प्रजापिता ब्रह्मा यांना दोन मुली होत्या, एकीचे नाव होते कद्रु आणि दुसरीचे नाव होते विनता. ऋषी कश्यप यांनी या दोघींसोबत विवाह केला. दोन पत्नीअसल्यामुळे ऋषी आनंदित होते. एकदा दोन्ही बहिणींनी ऋषींना वरदान मागितले. कद्रु ने शंभर नागांना जन्म देण्याचे आणि विनता ने दोन मुले जे नाग मुलांपेक्षा देखील शक्तिशाली असतील.असे वरदान प्राप्त केले. जेव्हा दोन्ही गर्भवती झाल्या, या दरम्यान ऋषी तपस्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेलेत. कद्रु ने 100 नागांना लागलीच जन्म दिला. तर विनता ला दोन अंडे झाले, ज्यांना तिने एका पात्रात ठेवले. 500 वर्ष निघून गेल्यानंतर देखील विनिताला पुत्र प्राप्ती होत न्हवती. तिने दोन्ही अंड्यांना फोडून टाकले. ज्यामधून एक मुलगा निघाला, पण त्या मुलाला डोके आणी शरीर तर होते पण पाय न्हवते. रागात येऊन नवजात बाळाने आपल्या आईला श्राप दिला की, हव्यास पोटी मला निर्माण ना होऊ देता आधीच मला बाहेर काढून टाकले. याकरिता त्याने श्राप दिला की तू दासी होशील.  तसेच दुसरा पुत्र जन्माला आल्यानंतर 500 वर्षानंतर तुला दासी जीवन मधून मुक्त करेल.  
 
श्राप दिल्यानंतर पुत्र अरुणला वाईट वाटू लागले की, मी माझ्याच आईला श्राप दिला. त्याचे रडणे ऐकून नारदमुनी तिथे आले. व म्हणाले की जे देखील झाले आहे ते भगवंताच्या इच्छिमुळे झाले आहे. तू वनामध्ये जा आणि उत्तर दिशेमध्ये स्थित शिवलिंगचे दर्शन घेऊन पूजा कर. तुला या हीन भावनेमधून बाहेर निघण्यासाठी मदत मिळाले. अरुण महाकाल वन मध्ये गेला. शिवलिंगची पूजा केली. त्याने ज्या शिवलींगाची पूजा केली ते गुफेमध्ये विराजमान आहे. भगवान शंकर त्याच्या आराधनेमुळे प्रसन्न झाले. व अरुणला सूर्याच्या सारथी बनण्याचे वरदान दिले. तेव्हा पासून हे शिवलिंग अरुणेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले.
 
अरुणेश्वर महादेव मंदिर कसे जावे-
खाजगी वाहन किंवा परिवहन बसने नागपुर वरून कंडाली रोड, अब्दालपुर, निंभोरा आणि शेवटी अमरावतीच्या रस्त्याने जावे लागले. तसेच हा महामार्ग महाराष्ट्रातून जातो.