मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. तीर्थ-क्षेत्र
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2024 (09:01 IST)

भुलेश्वर महादेव मंदिर पुणे

Bhuleshwar Temple
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असलेले भुलेश्वर महादेव मंदिर कोरीव नक्षींसोबत अद्भुत रहस्यांनी भरलेले आहे. भुलेश्वर महादेव मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शिव यांचे भुलेश्वर महादेव मंदिर, हजारो वर्षांपासून पिंडीच्या खाली अर्पित केला गेलेला नैवेद्य संध्याकाळी गायब होतो.
 
भारतामध्ये मंदिरांची वास्तुकला पासून त्यांच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा, रहस्य जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरांमध्ये लपलेले रहस्य आज पर्यंत कोणीही शोधू शकलेले नाही. तसेच पुण्यामधील भुलेश्वर महादेव मंदिर देखील रहस्यमयी आहे. इथे घडणाऱ्या रहस्यमयी घटना पाहून डोळे उघडेच राहतात. 
 
भुलेश्वर महादेव मंदिर महादेवाचे मंदिर आहे, जे पुण्यापासून कमीतकमी 45 किलोमीटर आणि पुणे सोलापुर राजमार्गावरून 10 किलोमीटरदूर अंतरावर आहे. हे मंदिर एका पहाडावर आहे. तसेच याचे निर्माण 13 व्या शतकात झाले आहे. मंदिराच्या भिंतीवर शास्त्रीय नक्षीकाम आहे. याला संरक्षित स्मारक घोषित केले गेले आहे. 
 
भुलेश्वर महादेव मंदिर आख्यायिका-
पौराणिक कथेनुसार, एकदा महादेव या मंदिरात साधना करीत होते. तेव्हा माता पार्वतीने एक रूप धारण करून महादेवांची तपस्या भंग केली. तसेच भगवान शंकर माता पार्वतीला ओळखू शकले नाही म्हणून या मंदिराला भुलेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले.
 
नैवेद्य होतो अदृश्य-
या मंदिरामध्ये मागील 250 वर्षांपासून पिडींच्या खाली नैवेद्य ठेवण्याची परंपरा आहे. महादेवांना अर्पित केलेला नैवेद्य संध्याकाळच्या आरतीच्या वेळीस अदृश्य होतो. तसेच नैवेद्याचा काही भाग ताटलीत उरलेला असतो. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की नागदेवता स्वतः येऊन हा प्रसाद ग्रहण करतात.  तसेच इथे महादेवांसोबत गणेश जी, कार्तिकेय आणि पूर्ण कुटुंबाला नारीरूपात पुजले जाते.
 
तसेच महादेवांच्या मंदिरांमध्ये नंदीजी शिवलिंग समोर विराजमान असतात, पण मंदिरामध्ये शिवलिंग समोर नंदीजींचे मुख नाही तर दुसऱ्या बाजूला आहे. 
 
भुलेश्वर महादेव मंदिर इतिहास-
भुलेश्वर महादेव मंदिराचे निर्माण 13 व्या शतकात यादव राजवंशद्वारा करण्यात आले आहे. मंदिराची  वास्तुकला की द्रविड शैलीची आठवण करून देते. मंदिरातील बाहेरील दरवाजे जटिल नक्षीकामांनी सजवले आहे, जे हिंदू पौराणिक कथांच्या दृश्यांसबोत पुष्प आणि ज्यामितीय पैटर्नला दर्शवतात. मंदिराच्या प्रवेशव्दारावर अलंकृत तोरण आहे ज्यावर विविध देवी-देवतांची चित्र आहे. 
 
तसेच भुलेश्वर महादेव मंदिरात साजरा करण्यात येणार सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रि आहे.  तसेच नवरात्री देखील मंदिरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते.
 
भुलेश्वर महादेव मंदिरात जावे कसे?
पुण्यापासून अवघ्या 45 किमी अंतरावर असलेले भुलेश्वर महादेव मंदिर पाहायला जाण्यासाठी पुण्यावरून खाजगी वाहन देखील उपलब्ध असतील. तसेच परिवहन ने देखील जात येते. हे मंदिर पुणे सोलापुर राजमार्गावरून 10 किलोमीटर अंतरावर आहे.